फेब्रुवारीपासून दीपिका पादुकोण सुरू करेल 'XXX'ची शूटिंग

शुक्रवार, 8 जानेवारी 2016 (15:39 IST)
बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलिवूडला निघाली आहे. हॉलिवूडचा सुपरस्टार विन डिजल सोबत दीपिका आपला पहिल्या हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करणार आहे. 
 
दोघांचा फोटोही सध्या चांगलाच व्हायरल झालाय. दीपिका हॉलिवूडच्या या सिरीजमध्ये काम करणार असून लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. xxx: The Return of Xander Cageच्या दिग्दर्शकाने ट्विट करून याची पुष्टी केली आहे.
 
दीपिका पदुकोण हिने विन डीजल याच्यासोबत काढलेला एक सेल्फी शेअर केला आहे.  फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये xx चा लोगो दिसत आहे. त्यामुळे दीपिकाची आता हॉलिवूड वारी नक्की झाली आहे.  

वेबदुनिया वर वाचा