'फिल्म बझार'मध्ये 12 देशांचे चित्रपट

वेबदुनिया

शनिवार, 26 नोव्हेंबर 2011 (13:21 IST)
चित्रपटांच्या खरेदीसाठीचे दक्षिण आशियातील 'फिल्म बझार' इफ्फी महोत्वसात 24 ते 27 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय चि‍त्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) आयोजित केले आहे. यात 12 देशांमधील चित्रपट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

या फिल्म बझारमध्ये 40 देशांतील सुमारे 500 ‍प्रतिनिधी सामील झाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा 11 टक्क्यांनी यावर्षी प्रतिनिधींची वाढ झाली आहे. 12 देशांमधील 23 विविध चित्रपटांच्या माहितीची देवाण-घेवाण याद्वारे होणार आहे.

त्यात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, फ्रान्स, स्वीडन, इटली, लंडन, अमेरिका व भारत यांचा समावेश आहे. पर्यटन मंत्रायलाने इन्क्रिडेबल इंडियाच्या ब्रँडशी भागिदारी करून चित्रपट उद्योगात चित्रपट व्यापारासाठी भारत हे योग्य स्थळ असल्याचे सांगून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांना आकर्षित करण्यात येत आहे. फिल्म बाझारमध्ये सहभागी सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यासाठी 10 लाखांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या फिल्म बझारमध्ये भारतासह दक्षिण आशियातील चित्रपटांचा अधिक समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा