फिरोज खान यांची प्रकृती स्थिर

IFM
ब्रीच कॅडी रूग्णालयात उपचार घेत असलेले बॉलीवूड अभिनेता फिरोज खान यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आयसीयूमधून बाहेर आणण्यात आले आहे.

कर्करोगाने ग्रस्त असणा-या खान यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वेळीच उपचार झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा