एलीना परसीलने डिझाइन केलेल्या या ऑफ व्हाइट ड्रेसचा हाय-लो फॉल फिरवून प्रियांकाने पोझ दिल्या. त्यासोबतच तिने आपल्या आवडत्या ब्रँड क्रिस्टियान लाबुटिनोचा क्लच आणि मॅचिंग पम्प्स घातले होते. प्रियांकाच्या या ट्रेंडनंतर बॉलिवूडमध्ये या ड्रेसची ङ्खॅशन वाढली आहे. हुडी ड्रेस परिधान करणारी प्रियांका पहिलीच अभिनेत्री आहे. या ट्रेंडविषयी डिझाइनर नचिकेत बार्वेचे म्हणणे आहे, ‘हुडी पदराचे नवीन रुप आहे. हुडी लूकमध्ये भर टाकतो. हुडीला सांभाळणे थोडे कठीण जाते, मात्र प्रियांकाने अलगद सांभाळले. वसार्चेने आपल्या स्प्रिंग 2014
कलेक्शनमध्ये हुडी गाऊन, जॅकेटस्चे अनेक प्रकार सादर केले होते. यापूर्वी हॉलिवूड अभिनेत्री लेडी गागा, रीटा ओरा, निक मिनाज यांनी हुडी ड्रेस परिधान केले आहेत.’