प्रियांकाचा ‘आय कान्ट मेक यू लव मी’ अल्बम लाँच (पहा व्हिडिओ)

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (14:01 IST)
‘इन माई सिटी एंड एग्जॉटिक‘ या आपल्या पहिल्या-वहिल्या म्युझिक अल्बमनंतर प्रियांकाचा आणखी एक म्युझिक अल्बम लाँच करण्यात आलाय. नुकताच, प्रियांकाचा ‘आय कान्ट मेक यू लव मी’ हा नवीन अल्बम लाँच करण्यात आलाय. या अल्बममध्ये केवळ प्रियांकाचा आवाज ऐकायला मिळणार आहे. प्रियांकानं बरीच प्रतीक्षा केल्यानंतर याला आयटय़ूनमध्ये रिलीज करण्यात आलंय. ही माहिती खुद्द प्रियांकानं आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय ट्विटरच्या माध्यमातून.. गाणं डाऊनलोड करण्यासाठी तिनं गाण्याची लिंकही पोस्ट केलीय.


हे गाणं बोनी रैटच्या 1991 मध्ये आलेल्या मूळ गाण्याचं इलेक्ट्रोपॉप संस्करण आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, प्रियांका मात्र हे मानायला तयार नाही. प्रियांका म्हणते, बोनीला पाहून मला गायक बनण्याची प्रेरणा मिळालीय. हे गाणं माझ्यासाठी खूप वेगळं आहे. माझ्या गाण्यात डान्स म्युझिकही आहे. यापूर्वी आलेल्या.. इन माय सिटी या अल्बमलाही कौतुकाची थाप मिळाली होती. यामध्ये प्रियांकानं देसीपणा आणला होता. यामध्ये प्रियांका अमेरिकन- इंटरनॅशनल रॅपर पिटबुलसोबत दिसली होती.

वेबदुनिया वर वाचा