पोस्टरमध्ये रेडिओ नसणार

सोमवार, 18 ऑगस्ट 2014 (15:55 IST)
आगामी ‘पीके’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवरुन एवढा वाद निर्माण झालेला असताना देखील येत्या 20 ऑगस्टला ‘पीके’चे दुसरे पोस्टर आमिर रिलीज करणार आहे.
 
या पोस्टरबाबत माहिती देताना आमिर म्हणाला की, माझ्या पहिल्या पोस्टरमध्ये रेडिओ तरी होता, पण आता प्रकाशित होणार्‍या दुसर्‍या पोस्टरमध्ये माझ्या हातात रेडिओ देखील नसणार आहे. त्यामुळे आमिरचे दुसरे पोस्टर कसे असेल, अलीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे हे पोस्टर असेल का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पीकेचे पहिले पोस्टर प्रसिध्द झाल्यानंतर काही तासांच्या आतच कानपूरच्या एका वकिलाने या पोस्टर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. पीकेमध्ये आमिर भोजपुरी बोलताना दिसणार आहे. भोजपुरी भाषा शिकण्यासाठी दोन वर्ष प्रशिक्षण घेतल्याचे आमिरने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा