राखी सावंत आणि सेलिना जेटली यांनी केलेले आरोप म्हणजे निराधार वक्तव्य आहेत, त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचं सनी लिओनने म्हटलं आहे. त्यांची बोलण्याची पद्धत अनप्रोफेशनल असल्यामुळे दुर्लक्ष करणंच पसंत करेन, असंही सनी म्हणाली.
मी बॉलिवूडमध्ये चांगलं काम करण्यासाठी आले आहे. त्यावरच मी लक्ष केंद्रित करेन असंही सनी म्हणाली. अशा पद्धतीचे आक्षेपार्ह कमेंट कुठल्याच अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने केले नसतील, अशी पुष्टीही तिने जोडली. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, मला त्याची पर्वा नाही, असंही सनीचं म्हणणं आहे.