धोनीचा जीवनपट पडद्यावर येण्यास अडथळा

शुक्रवार, 5 जून 2015 (12:53 IST)
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा जीवनपट पडद्यावर येण्यास सुरू झालेली अडथळ्यांची मालिका कायम आहे. त्यामुळे अद्याप ‘महेंद्रसिंग धोनी, द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.
 
या सिनेमाची चाहते वाट पाहात आहेत. मात्र पैशाच्या व्यवहारांमध्ये सिनेमाचं प्रदर्शन अडकलं आहे. बीसीसीआयने या सिनेमासाठी आवश्यक असलेलं फुटेज (व्हिडिओ) देण्यासाठी 15 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर धोनीनेही 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
 
धोनीच्या काही अप्रतिम खेळी पडद्यावर दाखवण्यासाठी, निर्माते-दिग्दर्शकांना बीसीसीआयकडून काही फुटेज आवश्यक आहे. मात्र त्यासाठी बीसीसीआयने मोठय़ा रकमेची मागणी केली आहे.
 
तसंच धोनी सध्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याला एक मुलगीही झाली आहे. त्यामुळे निङ्र्काते-दिग्दर्शक हे सर्व सिनेमामध्ये घेऊ इच्छित आहेत, त्यामुळेही सिनेमाला उशीर होत आहे.
 
धोनी स्वत: या सिनेमाचा सहनिर्माता आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत धोनीची भूमिका निभावत आहे. तर नीरज पांडे या सिनेमाचा दिग्दर्शक आहे.

वेबदुनिया वर वाचा