जेव्हा रिक्षा ड्रायव्हर हृतिकला ओळखतही नाही..

गुरूवार, 25 सप्टेंबर 2014 (11:12 IST)
बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशनवर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली.. आणि गंमत म्हणजे ज्या रिक्षानं त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला हा एक बॉलिवूड स्टार आहे, याची भनकही लागली नाही. हिंदी सिनेमात सुपर स्टारडम पाहिल्यानंतर हृतिक रोशननं ही कधी कल्पनाही केली नसेल. हृतिकचा सुपरडान्स, त्याची रेखीव बॉडी, ‘कृष’ बनल्यानंतर इंडियन सुपर हिरोची इमेज आणि सुपर डुपर हिट सिनेमे.. ही सगळी कमाई असूनही काही सामान्य लोकांपर्यंत तो अजूनही पोहोचलेला नाही.

काही जण त्याला ओळखतही नाहीत. हे माहीत पडल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसलाय. नुकतंच याचा प्रत्यय आला. त्याचं झालं असं की, रात्री घरी परतत असताना हृतिकची गाडी रस्त्यातच बंद पडली. अशात त्याला घरी पोहोचण्यासाठी रिक्षा पकडावी लागली. पण, त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ज्या रिक्षातून त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरनं त्याला ओळखलंदेखील नाही. याबद्दल दुसरं तिसरं कुणी नाही तर हृतिकनंच माहिती दिलीय. 

वेबदुनिया वर वाचा