रामगोपाल वर्मा असं काही तर बोलतात की वाद निर्माण होतो, मुख्यता जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तेव्हा त्यांच्या कमेंट्सची संख्याही वाढते. यशासाठी प्रयत्न करत असलेले रामूची 'वीरप्पन' लवकरच रिलीज होणार आहे. यात जरीन खानवर 'खल्लास वीरप्पन' असा एक आयटमही आहे. सिनेमाचा प्रमोशन म्हणून रामूने जरीनची अशी प्रशंसा केली की त्याने रामूची मानसिकता कळून येते.