कॅब्रेमध्ये आग लावणार रिचा

शनिवार, 2 एप्रिल 2016 (10:55 IST)
आगामी ‘कॅब्रे’ चित्रपटात अभिनेत्री रिचा चढ्ढा अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून ‘कॅब्रे’ चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरनंतर चित्रपटातील गाण्याचा पहिला व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. 
 
‘मैं तो तेरे वास्ते ही हुई पानी पानी’ या गाण्यात रिचाचा जलाविष्कार पाहायला मिळतो.
 
या चित्रपटात रिचा एका कॅब्रे डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. कॅब्रे चित्रपटाच्या टीझरला यूटय़ूबवर दोनच दिवसांत दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. 
 
पूजा भट्ट आणि भूषण कुमार यांची निर्मिती असलेला हा चित्रपट कॅब्रेक्वीन हेलन यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जाते. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. चित्रपटात अत्यंत बोल्ड दृश्य दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याचवेळी चित्रपट कॅब्रेक्वीनची भावनिक बाजूही अधोरेखित करणार आहे. 
 
कौस्तव नारायण नियोगी यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात ‘हंटरर’ फेम अभिनेता गुलशन देवय्याही मुख्य भूमिकेत आहे. रिचा चढ्ढाच्या ‘मसान’ चित्रपटातील भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. तर काहीच महिन्यांपूर्वी आलेल्या ‘मैं और चार्ल्स’ चित्रपटात रणदीप हुडासोबत तिचे किसिंग सीन्सही चर्चेचा विषय होते.
 
दुसरीकडे रिचा ‘सरबजीत’ या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या चरित्रपटात सरबजीतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणदीप हुडा आणि ऐश्वर्या राय-बच्चन आहेत.

वेबदुनिया वर वाचा