कॅटरिना बुद्धिबळाची उत्कृष्ट खेळाडू

बुधवार, 27 मे 2015 (15:48 IST)
नेहमी बुद्धिबळाबद्दलची आपली आवड व्यक्त करणार्‍या आमिर खानला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी भेटली. आमिर खानला माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदसोबत बुद्धिबळ खेळण्याची संधी मिळाली होती. आमिर खान आणि विश्वनाथन आनंद ‘महाराष्ट्र चेस लीग’च्या तिसर्‍या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते. यादरम्यान हे दोघे बुद्धिबळाचा एक राऊंडही खेळले.

आमिरने या खेळासंदर्भात एका मुलाखतीत सांगितले की, बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ, परेश रावल आणि निर्माता आशुतोष गोवारीकर चांगलं बुद्धिबळ खेळतात.

आमिर खान ‘धूम-3’च्या सेटवर कॅटरिनासोबत नेहमी बुद्धिबळ खेळत असे. याशिवाय आमिर परेश रावल यांच्यासोबतही वेळ मिळाला की बुद्धिबळ खेळतो. आमिरच्या मते, क्रिएटीव्हीटी वाढवण्यासाठी हा खेळ उपयोगी आहे.

वेबदुनिया वर वाचा