करीना कपूर दिवसेंदिवस 'हॉट' होत चाललीये. कपडे उतरविणे असो की किस देणे ही कपूरकन्या मागे हटत नाही. जब वुई मेटमध्ये तिचा माजी बॉयफ्रेंड शाहिद कपूरला, मग टशनमध्ये तिचा सध्याचा प्रियकर सैफ अली खानला आणि कम्बख्त इश्कमध्ये अक्षयकुमारला तिने बिनधास्त 'किस' केले होते. आता करीनाने तिच्या आगामी थ्री इडियट्स या चित्रपटात आमीर खानसोबत किसींग सीन दिल्याचे बोलले जातेय. राजकुमार हिराणीच्या या चित्रपटात आमीर आणि करीनाचे तब्बल तीन हॉट किसींग सीन असल्याचे समजते. विशेष म्हणजे हे किसिंग सीन अगदी नैसर्गिकपणे आणि आतल्या उर्मीतून आल्यासारखे वाटावेत यासाठी बरेच रिटेकही घेण्यात आले. त्यातल्या एका सीनचे तब्बल चौदा रिटेक घेण्यात आले. हा किस खूपच छान जमल्याचे बोलले जातेय.