क्रिकेटर अझरुद्दीनवर एक सिनेमा बनवला जातोय.. या सिनेमात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राची देसाई हिचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर अझरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसेल, अशी चर्चा सुरू आहे.
अझहर आणि नौरीन यांचं लग्न 1987 मध्ये झालं होतं. नऊ वर्ष दोघांचा संसार सुरू होता. त्यांना दोन मुलंही झाली.. असद आणि अयाज.. पण, 1996 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अझहरनं अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्याशी दुसरा विवाह केला. अझरचा मुलगा अयाज याचा 2011 मध्ये एका बाईक अपघातात निधन झालं यावेळी तो 19 वर्षाचा होता.
नौरीनची भूमिका आव्हानात्मक असल्याचं प्राचीनं म्हटलंय. एका खूप प्रसिद्ध व्यक्तीची पत्नी असून लाईमलाईटपासून दूर राहणार्या त्याच्या पत्नीची ही भूमिका आहे. यापूर्वीही ‘वन्स अपॉन अ टाईम’मध्ये प्राचीनं मुस्लीम महिलेची भूमिका निभावलीय. पण, या भूमिकेसाठी प्राची लवकरच नौरीनची भेट घेणार आहे.