कंगनाने बंद केला मोबाइलचा वापर

गुरूवार, 16 एप्रिल 2015 (11:47 IST)
अधिकांश शूटिंग चालू असताना कुणाच्या तरी मोबाइलमधून फोटो घेतले जातात आणि चित्रपटाचा लुक नियोजित वेळेआधीच लीक होतो. या सगळ्या गोष्टींमुळे अनेक सेटवर मोबाइलबंदीचा फतवा काढण्यात येतो. अर्थात याला कलाकारांचा विरोध असतोच. पण कंगना रानावतने मात्र समजूतदारपणा दाखिवत 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'च्या सेटवर स्वत:हून मोबाइलचा वापर पूर्णत: बंद केला होता. चित्रीकरणाम्यान भूमिकेवरून आपले लक्ष विचलित होऊ नये यासाठी कंगनाने हे पाऊल उचलले.

वेबदुनिया वर वाचा