ऐ दिल है मुश्किलचे प्रदर्शन होणार मुश्कील

मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (16:59 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी  करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शने केली आहेत. मनसेने पाकिस्थानी कलाकरांच्या विरोधात मोहीम उघडली असून त्यान ४८ तास देश सोडण्यासाठी दिलोये होते.   ऐ दिल है मुश्किल' हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला आहे. तर हा चित्रपट  येत्या दिवाळीत प्रदर्शित होत असून त्यामध्ये रबणीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मासह पाकिस्तानी अभिनेता फवाद खान प्रमुख भूमिकेत आहेत.  उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले होते. त्यानंतर शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांनी पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. . त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शने करत ' ऐ  दिल है मुश्किल' चित्रपटाचं प्रदर्श रोखण्याची मागणी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा