आम‍िर खानला काळाराम मंदिरात शुटिंगला परवानगी

सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (15:28 IST)
बॉलिवूडमधील अभिनेता आमीर खान याला नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरात शुटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. आमीरच्या टीमला मंदिर प्रशासनाने शुटिंग करण्यास रोखले होते. मात्र, आमिरने दंडाची रक्कम भरल्यानंतर परवानगी देण्यात आली.
 
परवानगी नसतानाही अभिनेता आमीर खानने शुटिंग सुरु केल्याने मंदिर प्रशासनाने विरोध केला होता. काळाराम मंदिर हे नाशिकमधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. याठिकाणी कोणत्याही चित्रपटाचे किंवा मालिकांचे शुटिंग करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र आमीर खानने शुटिंग सुरु केल्याने मंदिर प्रशासन आक्रमक झाले आहे. 
 
आमिरने  25 हजाराची रक्कम भरल्यानंतर काळाराम मंदिर परिसरात शुटिंग करण्यास प्रशासनाने परवानगी दिली  आहे. आमीर खानच्या पीके चित्रपटात काही दृश्यांचा समावेश करण्यासाठी काळाराम मंदिर आणि रामकुंड परिसरात  शुटिंग सुरु होते. त्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती.
 
मात्र मंदिर प्रशासनाची परवानही न घेतल्यानं सुरुवातीला चित्रिकरणाला विरोध करण्यात आला. मात्र आता शुटिंगला  परवानगी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा