मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसची निर्मिती करणार्या अॅडेमॉल कंपनीने या शो मध्ये सहभागी होण्यासाठी कुमार विश्वास यांना पाच कोटी रुपयांची ऑफर केली आहे. यावरून विश्वास यांची लोकप्रियता देशात तसेच देशाबाहेर कमालीची वाढल्याचे चित्र आहे. राजकीय नेते कुमार विश्वास लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. गीतकार म्हणून विश्वास आपले नशीब आजमावणार आहे. विशेष म्हणजे विश्वास यांच्या गीतांना प्रसिद्ध गायक आशा भोसले यांचा आवाज लाभणार आहे.