अमृता रावचे शुभंमगल

मुंबई- बर्‍याच ‍काळापासून रूपेरी पड्यापासून दूर राहिलेली अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल हे विवाहबंधनात अडकले. गेल्या 7 वर्षापासून त्यांच्यात अफेअर सुरू होतं पण अमृताने हे अफेअर कधीच कोणाला कळू दिले नाही.
 
अनमोल हा रेडिओ जॉकी असून इश्क- विश्क सिनेमातून पदार्पण करणार्‍या अमृताला रूपेरी पड्यावर सत्याग्रह सिनेमा शेवटचे पाहिले होते. ती सध्या मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत दिसून येत आहे. या विवाहसोहळ्यात दोन्ही पक्षाकडील कुटुंबिय आणि खास मित्रमैत्रीणींच उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा