अभिषेक-ऐश्वर्यात मतभेद? अभिषेकने घेतले नवीन घर!

शुक्रवार, 16 जानेवारी 2015 (16:28 IST)
बच्चन परिवार बॉलीवुडमधील सर्वात जास्त पॉपुलर कुटुंबांपैकी एक आहे. या कुटुंबाची एक खासियत म्हणजे यांची एकी आणि फॅमिली ट्रेडिशन. अमिताभ बच्चन असो किंवा आराध्या, या कुटुंबातील आपसातील असणारे स्नेह सर्वांनाच माहित आहे. मग यांच्यात असे काय घडून आले की अभिषेक बच्चनला नवीन फ्लॅटची खरेदी करावी लागली. त्याचे असे आहे की अभिषेक बच्चनने मुंबईत एक नवीन फ्लॅट विकत घेतला आहे.  
 
अभिषेक बच्चनने मुंबईच्या वर्ली भागात एका इमारतीत 37व्या मजल्यावर 41.14 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. ज्युनियर बच्चनने ज्या जागेवर फ्लॅट विकत घेतला आहे तो वर्लीच्या एनी बेसेंट रोडवर आहे. स्काईलार्क टावरमध्ये अभिषेकने 1.06 लाख स्क्वायर फीटाप्रमाणे 3,875 स्क्वायर फीटचा फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटमध्ये पांच बेडरूम आणि 20 फूटाचा टॅरेस आहे. हे प्रोजेक्ट मुंबईच्या त्या प्रमुख प्रोजक्ट्समधून एक आहे, ज्यात येवढे मोठे टॅरेस काढण्याची परवानगी आहे. स्काईलार्क अपार्टमेंटसाठी दोन विंग परमिशन देण्यात आली आहे, जी 67 मजल्यापर्यंत उंच असेल. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत दोन बंगले आहे जलसा आणि प्रतीक्षा. सध्या संपूर्ण बच्चन परिवार एकत्र जलसात राहत आहे. आता थोड्या दिवसात याचा उलगडा लागेलच की अभिषेक कुटुंबापासून दूर जाऊन फ्लॅटमध्ये राहिला तर नाही ना गेला? तसेच महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांअगोदर अशी अफवा पसरली होती की अभिषेकची बायको अर्थात ऐश्वर्या राय आणि जया बच्चनमध्ये थोडी खटपट सुरू आहे. ज्यामुळे ऐश फार तनावात आहे. या वर्षी अमिताभ बच्चनचे चित्रपट पीकू, शमिताभ आणि वजीर रिलीज होत आहे तर आपण हीच उमेद करू की संपूर्ण परिवार एकत्र होऊन हा आनंद साजरा करेल.  

वेबदुनिया वर वाचा