एका पोलीस अधिकार्याच्या माहितीनुसार, या अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये 78 हँड बॅग, 8 जॅकेट, 37 सनग्लासेस, 43 ट्राऊजर्स आणि चपलांचे 40 जोड सापडले. शिवाय ब्रँडेड कंपनीच 35 परफ्यूमच्या बॉटल्सही लीना पॉलच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आल्या आहेत. या परफ्यूम बॉटल्सच्या किंमती लाखाच्या घरात आहेत. शेखर चंद्रशेखरच्या रुममध्ये 42 जीन्स, 200 टी शर्ट्स, 73 शर्ट्स आणि चपलांचे 80 जोड सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.