अभिनेता अमिर खान विरोधात पुण्यात खटला दाखल

बुधवार, 13 ऑगस्ट 2014 (16:00 IST)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिष्ट अमिर खान आगामी सिनेमा ‘पी.के.’च्या पोस्टरवरून वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. पी.के.च्या प्रमोशनसाठी प्रसार माध्यमांमधून अश्लील जाहिराती करणार्‍या अमिर खान याच्याविरोधात पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.एस.जाधव यांच्या कोटात खटला दाखल करण्यात आला आहे. 
 
राजेंद्र सोनार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सोनार यांनी  चित्रपटाचे निर्माता निर्माता विधुविनोद चोप्रा, दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता यांची कृती बिभत्स असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अ‍ॅड.वाजेद खान हे याचिकाकर्ते सोनार यांचे काम पाहात आहे. देशभर या जाहिरातीविरोधात निर्देशने करण्यात आले असल्याचेही सोनार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

वेबदुनिया वर वाचा