अनु अग्रवालने सांगितली खासगी आयुष्यातील गुपिते

मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (10:12 IST)
1990 साली आलेल्या ‘आशिकी’ चित्रपटात अनुची भूमिका साकारणारी दिल्लीतील अनु अग्रवाल मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. तिनं आपल्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केलीय. तिची आत्मकथा ‘अनयूजवल : मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड’ प्रकाशित झालीय.
 
अनुचं म्हणणं आहे तिची कथा म्हणजे एका मुलीचं आयुष्य वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये कसं विखुरलं गेलंय. अनु दिल्लीतून मुंबईत आली. तिथं एक आंतरराष्ट्रीय मॉडेल झाली आणि नंतर तिनं चित्रपटांमध्ये काम केलं. नंतर ती उत्तराखंडमधील एका योगाश्रमात गेली आणि नंतर पुन्हा मुंबईत आली. या दरम्यान एका कार अपघातानंतर ती तब्बल 29 दिवस कोमामध्ये होती. अशा पद्धतीनं एक अभिनेत्री, निवृत्ती आणि नंतर योगगुरू म्हणून परतणार्‍या अनुची ही आत्मकथा हार्पर कॉलिन्सनं प्रकाशित केलीय.
 
अनु स्वत:ला सौभाग्यशाली मानते कारण तिच्या सेक्स, वासना आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधांच्या शोधासाठी तिनं काहीच कमी केलं नाही. आपल्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल सांगतांना अनु म्हणते, प्रत्येक वेळी नवी जागा, नवा जोडीदार आणि नवे प्रेमसंबंध.. फक्त प्रेम करणारा बदलला बाकी काही नवं घडलं नाही. अनुनं आपल्या आत्मकथेत अँग्लो-इंडियन जॅझ संगीतकार रिकपासून तर एका तंत्रज्ञासोबत प्रस्थापित केलेल्या शारीरिक संबंधांबद्दल सांगितलंय. सोबतच संन्यास घेतल्यानं आपल्या आयुष्यात अभूतपूर्व असा बदल घडल्याचं तिनं सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा