अखेर.. दीपिकानं रणवीरबद्दलचं प्रेम केलं व्यक्त

शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (12:32 IST)
अभिनेत्री दीपिका पदुकोणं अखेर अभिनेता रणवीर सिंगबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंच.. ही ‘प्रेमा’ची व्याख्याही दीपिकानं स्वत:ची आणि स्वत:साठी बनवलीय. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांच्या अफेअरबद्दल बॉलिवूड वतरुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दोघं एकमेकांना पुरेसा वेळ देत असले, तरी दोघंही आपलं प्रेम जाहीर कबूल करायला कचरताना दिसतात. रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर तर दीपिका याबद्दल जरा जास्तच जागरूक झालेली दिसली. पण, पहिल्यांदाच तिनं रणवीर सिंगवर असलेल्या आपल्या मनातील भावना उघड व्यक्त केल्या.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, दीपिकाला रणवीरबद्दल छेडण्यात आलं. रणवीर सिंग आपल्या आयुष्यात आहे, हे जाणून तुला तू पूर्ण असल्याचं वाटतं का? असा आडवळणाचा प्रश्न दीपिकासमोर ठेवण्यात आला. तेव्हा, या बॉलिवूड ‘डिप्पी’ आपल्या गालावरची खळी आणखीनच खोल नेतं म्हटलं की, ‘कोणत्याही अटींशिवाय तुमच्यावर कुणाचं तरी प्रेम असणं हे खूप आनंददायी असतं’. यावर, तीनं आपली प्रेमाची व्याख्याही स्पष्ट केली. ‘दुसर्‍या कुणी तुमच्यावर प्रेम करण्याअगोदर तुम्ही स्वत: जसे आहात तसेच स्वत:ला स्वीकारणं आणि स्वत:वर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे’. 

वेबदुनिया वर वाचा