चाहत्यांची भावना आणि सध्या चाललेला ‘ट्रेंड’ लक्षात घेऊनच अक्षयने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. आपल्या चित्रपटात गाणे गायल्यानंतर अक्षय आता बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, सलमान, आमिर, हृतिक यांच्या रांगेत जाऊन बसला आहे. यापूर्वी अक्षयने ‘सिंग इज किंग’मधील गाण्याचे बोल गुणगुणले होते.