अक्षयचा रुस्तम 100 कोटी पार

मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (09:48 IST)
बॉलिवूड खिलाडी अक्षयकुमारच्या रुस्तम या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटींचा पल्ला पार केलाय. नऊ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 101.08 कोटींची कमाई केलीये. 
 
कमी दिवसांत 100 कोटींच क्लबमध्ये प्रवेश करणार्‍या चित्रपटांच्या यादीत रुस्तम दुसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर सलमानचा सुल्तान तर तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर अक्षयचाच एअरलिफ्ट आणि हाऊसफुल्ल 3 हा सिनेमा आहे. रुस्तमने 100 कोटींचा आकडा पार केला.
 
पहिल्या आठवडय़ात रुस्तमने 50.42 कोटींची कमाई केली. रुस्तमच्या लाटेपुढे मात्र हृतिक रोशनचा मोहेंजोदडो आणि हॅप्पी भाग जायेगी या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा