अक्षयचे कुस्ती प्रेम

IFMIFM
सर्वसाधारणपणे आपल्याकडे क्रिकेट व फुटबॉल या खेळांमध्ये लोकांना जास्त रूची असते. पण 'खिलाडी' अक्षय कुमारला मात्र आवडते ती कुस्ती.

अक्षय कुस्तीवर आधारीत चित्रपटात अभिनय करत नाहीये. पण त्याने कुस्तीप्रेम वेगळ्याच पद्धतीने दाखवून दिले आहे. त्याने पाच पहिलवानांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वतः:च्या खांद्यावर घेतली आहे.

26 जानेवारीला अंधेरीच्या स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये वार्षिक कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अक्षयही उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान आयोजक संजय निरुपम यांनी अक्षयला या खेळासाठी काही तरी मदत करण्याचा आग्रह केला. अक्षय जणू या संधीचीच वाट पहात होता. त्याने लगेचच पाच खेळाडूंचा आर्थिक खर्च करण्याची तयारी दाखविली.

अक्षयचे वडील पहिलवान होते. त्यामुळे त्यालाही कुस्तीचा खेळ आवडतो. आपल्या देशात गुणवत्ता आहे. पण पैशांच्या अडचणीमुळे अनेक गुणवान खेळाडू पुढे जाऊ शकत नाहीत. क्रिकेट किंवा टेनिस या खेळांना प्रायोजित केले जाते पण कुस्तीसारखा खेळ उपेक्षितच राहतो.

असे असताना अक्षय कुमारने दाखविलेल्या या दातृत्वासाठी त्याचे कौतुकच केले पाहिजे नाही का?

वेबदुनिया वर वाचा