आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदारांची मते जाणून घेण्यासाठी आणि पक्षासाठी अनुकूल असलेले प्रभाग ओळखण्यासाठी एका खासगी एजन्सी मार्फत100 प्रभागांचं सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणासाठी पुण्यातील एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.एजन्सी मार्फत सर्वेक्षण सुरु असल्यामुळे अहवालात कोणताही पक्षपात होणार नाही. तसेच या सर्वेक्षणामुळे पक्षाला जिंकण्याची संधी असलेल्या क्षेत्रांची माहिती मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्वेक्षण संस्था सर्वेक्षण अहवाल तीन टप्प्यात सादर करेल. त्यात प्रभागातील स्थानिक राजकीय परिस्थिती, मतदारांची भूमिका, प्रभागाच्या विकासाचे मॉडेल प्रमुख्याने आहे. या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वेक्षण केल्यावर ही संस्था माणसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कडे अहवालाचे सादरीकरण करेल.