कमी वयातच ते बनारसला संस्कृत शिकण्यासाठी आले. ह्यांचा संस्कृत आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त इंग्रजी, कन्नड, मलयाळम,हिंदी, उर्दू या भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा युद्धपद्धतीचे कौतुक होते. येथेच ते अनेक क्रांतिवीरांच्या संपर्कात आले. चंद्रशेखर आझाद सचिन्द्रनाथ सान्याल इत्यादींशी भेट झाली. ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन उत्तर भारतात क्रांतिकार्यात भाग घेतले.
ते पुण्यातून पकडले गेले तिथे त्यांना अटक करण्यात आली आणि अखेर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह आणि सुखदेव ह्यांच्या सह त्यांना लाहोरच्या सेंट्रल कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांनी देशासाठी मरण पत्कारून आपले नाव हुतामांच्या यादीमध्ये नोंदविले आहे .त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावाचे नाव राजगुरुनगर असे नामांतरित केले आहे.
Edited By - Priya Dixit