Summer Travel: भारतातील या ठिकाणी उन्हाळ्यातही थंडी असते, बजेटमध्ये प्रवास करण्याचा विचार करू शकता

बुधवार, 23 मार्च 2022 (15:44 IST)
उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा चढू लागला आहे. अशा परिस्थितीत जे लोक थंड ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचा विचार करत आहेत, त्यांना या हंगामात जाण्यासाठी असे काही थंड ठिकाण आहेत ज्या ठिकाणी प्रचंड  उन्हाळ्यात देखील तापमानाचा पारा कमी राहतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यातही थंडी जाणवेल अशी जागा शोधत असाल तर अनेक पर्याय शोधता येतील. या ठिकाणी थंड हवामान सह नैसर्गिक दृश्ये देखील पाहायला मिळतात. चला तर मग अशा ठिकाणांबद्दल जाणून घेऊ या.
 
1 सोनमर्ग ,काश्मीर- काश्मीरला पृथ्वीचे स्वर्ग म्हणतात, इथे हिवाळ्यात तर खूपच थंडी असते पण उन्हाळयात देखील थंडी जाणवते.काश्मीरच्या सोनमर्गचे हवामान सामान्य आहे, थंडीत गोठणारा बर्फ वितळल्याने इथे थंडावा जाणवतो.
 
2 मनाली, हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशात अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे दरवर्षी अनेक पर्यटक पोहोचतात. या ठिकाणी हिवाळ्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात देखील पर्यटकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत आपण मनालीत भेट देण्यासाठी जाऊ शकता.इथले नैसर्गिक दृश्य पर्यटकांना भुरळ घालतात.
 
3 सेला पास, अरुणाचल प्रदेश- हिवाळ्यातील बर्फाच्छादित भागात सामान्य तापमान असूनही उन्हाळ्यातही थंडी जाणवते. अरुणाचल प्रदेशातील सेला पासमध्ये वर्षभर बर्फाची पातळ चादर असते. उन्हाळ्यात इथे फिरायला मजा येते.
 
4 लाचुन गाव, सिक्कीम-उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एक चांगला पर्याय आहे. लाचुन गाव थंड हवामान आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.
 
5 लडाख - लडाखचे नाव भारतातील सर्वात थंड ठिकाणांमध्ये समाविष्ट आहे.इथे हवामान नेहमी थंड असते. इथली नैसर्गिक दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात. उन्हाळ्यात आपण लडाखच्या थंड वातावरणात भेट देऊ शकता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती