अशा काही परदेशी जागांबद्दल जाणून घ्या

गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (10:56 IST)
1. मकाओ - मकाओ हे आशियातील एक ठिकाण आहे जे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. हे पर्यटन, रेस्टॉरंट्स आणि कॅसिनोसाठी विशेषतः ओळखले जाते. चीनचा हा विशेष क्षेत्र त्याच्या प्रशासनातच येतो. इथे भारतीय व्हिसा नसताना फिरू शकतात. कॅसिनोची आवड असणार्‍या लोकांसाठी हे स्वर्ग म्हटले जाते. इथले सुमारे 20 टक्के लोक कॅसिनोमध्ये काम करतात. येथे आपण मकाओ टॉवर, सेनाडो स्क्वेअर, मकाओ संग्रहालय, कॅथेड्रलसारख्या अनेक ठिकाणी फिरू शकता. जर आपल्याला खाण्याची आवड असेल तर ही जागा आपल्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण असू शकत. हे ठिकाण एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.
 
2. नेपाळ - नेपाळ आणि भारत यांच्यातील भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक अंतर अगदी नाहीसा आहे. अन्न, भाषा आणि पोशाख सर्वच क्षेत्रात हे देश भरतासारखेच आहे. हे एक अत्यंत विलक्षण पर्यटन देश आहे. येथे तुम्ही काठमांडूपासून सुंदर टेकड्या आणि नैसर्गिक सौंदर्यांकडे बघू शकता. स्वस्तात फिरायच्या बाबतीत नेपाळ भारतीयांसाठी स्वर्गाहून कमी नाही.
 

3. भूतान - भूतान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक पण जगातील सर्वात आनंदी आणि शांत देश आहे. येथे जगातील सर्वात सुंदर नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक जातात. भारतीयांना भूतान जाण्यासाठी कोणत्याही वीजाची गरज नाही. कारण भारताच्या तुलनेत त्याचे चलन फार स्वस्त आहे, म्हणून येथे फिरणे ही खिशावर भारी नसते. प्राचीन मंदिराव्यतिरिक्त हे देश बौद्ध मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. आपण आजारी असाल आणि आपल्याला हवामान बदलण्यासाठी कुठेतरी जाण्याचा सल्ला जर  डॉक्टरांनी दिला असेल तर विश्वास ठेवा की येथे गेल्याने तुम्हाला फार फायदा होईल. येथील खाद्यपदार्थ आणि खरेदी करण्यासाठी बर्‍याच वस्तू तुम्हाला आकर्षित करतील.
 
4. मालदीव - मालदीव एक पर्यटक देश आहे. हिंद महासागरा जवळ असलेले हे बेट लहान-लहान समुद्र किनाऱ्याच्या मध्यभागी आहे. आपण एक भारतीय असाल आणि आपण आपला प्रवास एखाद्या सुंदर देशात नियोजन करीत असाल तर मालदीव हा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण व्हिसाशिवाय सुमारे 30 दिवस येथे राहू शकता. आपल्याला इथे भारताबाहेर असल्यासारखे वाटत नाही. मालदीवबद्दल विशेष म्हणजे, येथे आपल्याला लक्झरी जीवन जगण्यासाठी जास्त खर्च नाही करावे लागणार. मालदीव हा जगभरातील एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. 2017 मध्ये 12 लाख परदेशी पर्यटक आले होते. अंडरवॉटर फोटोग्राफी, व्हेल आणि डॉल्फिनचे दृश्य, एक विलासी रिसॉर्ट असलेला हा छोटा देश आपल्यास आवाहन करेल. केरळमधील तिरुवनंतपुरम येथून मालदीवची राजधानी मालेसाठी थेट उड्डाण आहे. फ्लाईटचे भाडे देखील खूप कमी आहे.
 
5. कंबोडिया - येथे तुम्हाला हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे काही अवशेष सापडतील. येथे प्राचीन खमार सभ्यता हिंदू लोकांशी संबंधित आहे. हे दक्षिण आशियातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. एका वेळी याला कंपूचिया देखील म्हटले जात होते. येथे फिरणे आर्थिक दृष्टीने देखील स्वस्त आहे. कमी पैशात आपल्याला इथली जीवन संस्कृती आकर्षित करेल. अंकोरवाट मंदिर देखील संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती