कुष्मांडा देवी मंदिर कानपूर

रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
दुर्गा देवीचे चौथे रूप आहे कुष्मांडा. तसेच हे कुष्मांडा देवीचे मंदिर हे कानपूर मधील घाटमपूर ब्लॉक मध्ये स्थित आहे. आपल्या उदरामध्ये संपूर्ण ब्रम्हाण्डला सामावून घेणारी देवी म्हणून कुष्मांडा ओळखली जाते. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. तसेच देवीच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.  
 
येथे माता कुष्मांडा देवीचे पिंडीच्या रूपात दोन मुखांसह विराजमान आहे, ज्याचा प्रारंभ आणि शेवट आजपर्यंत कोणालाही सापडलेला नाही. तसेच देवीच्या पिंडीतून वर्षभर पाणी झिरपत राहते, ते कुठून येते हे कोणालाच माहीत नाही, पण या पाण्याची उपयुक्तता खूप अद्भुत आहे. तसेच येथील मान्यता आहे की, देवी कुष्मांडाच्या मूर्तीतून ओघळणारे पाणी डोळ्यांना लावले तर डोळ्यांचे गंभीर विकारही लवकर बरे होतात, व देवी आपल्या भक्ताला आरोग्य प्रदान करते. असे मानण्यात येत असल्याने याठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्त दाखल होतात.  
 
इतिहास-
असे म्हणतात की, दोनमुखी कुष्मांडा देवीची मूर्ती शैली मराठा काळातील आहे, जे दुसऱ्या ते पाचव्या शतकातील आहे. कोहरा नावाच्या एका गुराख्याने हे शोधून ती शोधून काढली होती. तसेच जेव्हा या प्रदेशाचा राजा घाटमपूरला जात असे. तेव्हा त्यांनीच या ठिकाणी 1330 मध्ये माँ की मढिया बांधली, त्यानंतर 1890 मध्ये एका व्यावसायिकाने या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करून घेतला.
 
नवरात्रीत दहा दिवस येथे विशेष पूजा केली जाते. अनेक भक्त देवी आईजवळ आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना करतात. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. तसेच कुष्मांडा मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अनेक वाहन कानपूरला जाण्यासाठी उपलब्ध आहे. कानपूरला पोहोचल्यानंतर मंदिरात जाण्यासाठी तुम्ही कॅब किंवा टॅक्सीची मदत घेऊ शकता. तसेच कानपूरहून घाटमपूर स्टेशनवर उतरूनही मंदिरात जाता येते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती