येथे करतात महाभारताील अशा व्यक्तीची पूजा

बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (15:33 IST)
भारतात विचित्र आणि रहस्यमय मंदिरे आहेत. येथील काही मंदिरांमध्ये अशा विचित्र गोष्टींची पूजा केली जाते, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. दक्षिण भारतातील केरळ राज्यातील मायामकोट्टू मलंचरुवू मलानाड मंदिर हे असेच एक मंदिर आहे. या मंदिरात महाभारतातील एका व्यक्तीची पूजा केली जाते, ज्याला सहसा खलनायकाचा दर्जा दिला जातो. या व्यक्तीच्या स्वार्थामुळे महाभारत युद्ध झाले आणि त्यात लाखो लोक मरण पावले, असेही म्हणतात. 
 
मामा शकुनीची पूजा केली जाते 
केरळच्या या मंदिरात दुर्योधनाचे मामा शकुनी यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की जेव्हा महाभारत युद्ध संपले आणि दुर्योधनाचाही मृत्यू झाला तेव्हा मामा शकुनीने प्रायश्चित केले की या महाभारत युद्धामुळे बरेच दुर्दैव झाले. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू तर झालाच, पण साम्राज्याचेही बरेच नुकसान झाले. नंतर पश्चातापामुळे शकुनी संन्यास घेऊन प्रवासाला निघाले. प्रवास करत ते केरळ राज्यातील कोल्लम येथे पोहोचले. तेथे त्यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शिवाने त्याला दर्शन दिले. या ठिकाणी आता शकुनी मामाचे मंदिर आहे. या मंदिराचे नाव मायामकोट्टू मलंचरुवू मलानाड मंदिर आहे. 
 
पवित्रस्वरम या नावाने प्रसिद्ध आहे  
मामा शकुनीने ज्या दगडावर बसून ध्यान केले होते त्याचीही पूजा केली जाते आणि हे स्थान पवित्रस्वरम म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात मामा शकुनीशिवाय किरातमूर्ती आणि नागराज यांचीही पूजा केली जाते. यासोबतच दरवर्षी मलक्कुडा महालसवम महोत्सवही भरवला जातो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. या मंदिरात मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते असा विश्वास आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती