India Tourism : भारतात अनेक प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत, परंतु काही मंदिरांची त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे एक वेगळी ओळख आहे. आज आपण अश्याच काही शिवमंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
तुंगनाथ मंदिर, उत्तराखंड
उत्तराखंडच्या गढवाल हिमालयात १२,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिव मंदिर मानले जाते. तिथे पोहोचण्यासाठी चोपटा येथून ट्रेक करावा लागतो. सभोवतालचे बर्फाच्छादित पर्वत आणि शांत वातावरण या मंदिराला अत्यंत विशेष बनवते. येथील शांत वातावरण भक्तांना गहन शांतीची भावना प्रदान करते.
भोजेश्वर मंदिर, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील भोजेश्वर मंदिर हे त्याच्या विशाल शिवलिंगासाठी ओळखले जाते. ११ व्या शतकात राजा भोजने याच्या बांधकामाची सुरुवात केली, परंतु हे मंदिर कधीही पूर्ण झाले नाही. तरीही, त्याची भव्य दगडी रचना याला अत्यंत विशेष बनवते.
पाताल भुवनेश्वर, उत्तराखंड
पाताल भुवनेश्वर हे देखील उत्तराखंडमध्ये स्थित एक गुहा मंदिर आहे. येथील भूमिगत चुनखडीच्या गुहांमध्ये देवतांशी संबंधित नैसर्गिक रचना आहेत. येथे पोहोचण्यासाठी अरुंद मार्गांमधून मार्ग काढावा लागतो. गुहेच्या आत एक विशेष शिवलिंग आहे, जे स्थानिकांच्या मते दरवर्षी थोडे थोडे वाढते. असेही म्हटले जाते की ज्या दिवशी हे शिवलिंग गुहेच्या छताला स्पर्श करेल, त्या दिवशी जगाचा अंत होईल.