Dubai Hindu Temple दुबईचे हिंदू मंदिर पर्यटकांसाठी आकर्षण

शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (08:32 IST)
दुबई मधील जेबेल अली येथे बांधलेले नवीन हिंदू मंदिर जगभरात चर्चेत आहे. दुबईला एकदा भेट देण्यासाठी जात असलेल्यांनी एकदा या मंदिरात देखील जावे. दुबई शहरात हिंदू आणि शीख समुदायासाठी एका भव्य मंदिराचे उद्घाटन झाले आहे.
 
एका अहवालानुसार या भव्य मंदिराची पायाभरणी 2020 मध्ये करण्यात आली होती. दुबईतही हिंदू मंदिर असावे, अशी मागणी आजूबाजूच्या लोकांकडून होत असल्याचे सांगितले जाते. अहवालानुसार, ते 5 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.
 
या भव्य मंदिरात एक नाही तर 16 हून अधिक देवदेवतांच्या मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व मूर्ती प्रार्थनागृहात आहेत, जेथे कोणीही भक्त जाऊ शकतो.
 
या विशाल मंदिराच्या प्रांगणात भगवान शिव, कृष्ण आणि गणेश यांच्यासह महालक्ष्मीची मूर्ती देखील आहे.
 
मुख्य प्रार्थना हॉलमध्ये बहुतेक देवतांची स्थापना केली गेली असून यात मध्यवर्ती घुमटावर एक मोठे 3-डी मुद्रित गुलाबी कमळ बसवलेले आहे. हे जेबेल अलीमध्ये पूजा गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अनेक चर्च आणि गुरु नानक दरबार गुरुद्वारा देखील आहेत. मंदिरात गुरु ग्रंथसाहिब देखील स्थापित आहेत. 
 
पांढऱ्या संगमरवरी बनलेल्या या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दुबईच्या कानाकोपऱ्यातून हिंदू धर्माचे लोक पोहोचत आहेत. मंदिराचे अनेक भाग सुंदर कोरीव कामांनी सजवलेले आहेत आणि मंदिराच्या छतावर बांधलेल्या अनेक घंटा देखील विशेष आहेत.
 
या मंदिरात जाणे तितके सोपे नाही. या मंदिराला भेट देण्यासाठी हिंदू मंदिराच्या वेबसाइटवरून क्यूआर कोड स्कॅन करून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, असे सांगण्यात येत आहे.
 
मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळानुसार येथील प्रवेशिका सकाळी साडेसहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुली असतील. मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश मिळेल. दररोज सुमारे 1000 ते 1200 भाविक हिंदू मंदिराला भेट देऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती