सर्वात फोटोजेनिक ठिकाणे.........

मंगळवार, 8 एप्रिल 2014 (17:05 IST)
छायाचित्र काढण्यासाठी सर्वात योग्य, सुन्दर ठिकाण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर ताजमहालच उभा राहतो. ताजचे आरसपानी सौंदर्य कालातीत आहे.

मात्र जगातील अन्यही काही सुन्दर ठिकाणे नजरा खिळवून ठेवतात. अशाच काही ठिकाणांची ही माहीती..........

1) बोरा बोरा:

फ्रेंच पोलिनेशियामधील अनेक बेटांमध्ये 'बोरा बोरा' या बेटाचा समावेश होतो. हे बेट चारही बाजूंनी लॅगूननी वेढलेले आहे. संपूर्ण जगात अक्वा-सेंट्रिक लग्झरी रिसार्टसाठी ते प्रसिद्ध आहे. ऑगस्ट 2007च्या जनगणनेनुसार तिथे 8,880 इतकर लोकसंख्या होती. तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर आधारलेली आहे. 
ग्रेट बॅरिअर रीफः 
 
आस्ट्रेलियाच्या किनार्‍याजवळ जगातील सर्वात मोठी प्रवाळरचना आहे. ती 2,900 रीफ आणी 900 बेटांनी बनलेली आहे. ही कोरल रीफ सिस्टम 2300 किलोमीटरपर्यंत फैलावलेली आहे. हे जगातील एकमेव असे सर्वात मोठे सिंगल स्ट्रक्चर आहे जे सूक्ष्म जीवांनी बनवलेले आहे. हे इतके मोठे आहे कि ते विमानातूनही स्पष्ट दिसते. 
ग्रँड कॅनियनः 
 
अमेरिकेतील या खोल दरीची लांबी 446 किलोमीटर आहे. तिची रुंदी 29 किलोमीटर असून खोली 1800 मीटरपेक्षाही अधिक आहे. अरिझोनाची नदी कोलोरॅडोच्या वेगवान प्रवाहाने ही दरी बनली. या दरीचा आकार आणी तेथील रंगसंगतीही वैशिष्ट्य़पूर्ण आहे. 
पेट्राः 
जॉर्डनमधील हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे पर्यटक मोठया संख्येने भेट देतात. त्याचा बांधकामात रोज स्टोनचा वापर झाला आहे. त्यामुळे या शहरालाही रोज सिटी म्हटले जाते. 1984 पासून हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट आहे. 
हा लाँग बेः 
व्हिएतनाममधील हे सर्वात प्रसिध्द ठिकाण आहे. 'हा लाँग' चा अर्थ 'सुन्दर ड्रगन' असा होतो. 1593 किलोमीटरमध्ये फैलावलेल्या या बेमध्ये दोन जारपेक्षाही अधिक आयलेट्स आहेत जे लाईमस्टोन्सपासून बनवले आहेत. तेथील जैवविविधताही भरपूर आहे. 

वेबदुनिया वर वाचा