दर्शनीय हाँगकाँगचं डिस्ने रिसॉर्ट

मंगळवार, 4 मार्च 2014 (10:40 IST)
डिस्ने कुटुंबातल्या कार्टूनसोबत खायचं-प्यायचं आणि धम्माल करायची असेल तर हाँगकाँगचं डिस्ने रिसॉर्ट हा एक चांगला पर्याय आहे. इथली दुनिया फक्त लहानग्यांनाच भुलवत नाही तर मोठ्यांनाही परत एकदा लहान व्हायला लावते. या रिसॉर्टच्या गेटपासून एक वेगळचं विश्व सुरू होतं. त्यात डिस्ने थीमने सजलेली कॅण्डी शॉप, मॅजिक स्टोअर्स आणि कॉफी पार्लर्स आहेत. शिवाय इथे तुम्हाला नुसते नोकर-चाकर दिसणारच नाहीत. डिस्नेतली वेगवेगळ कॅरॅक्टर्सची रंगीबेरंगी रुपात तुमच्या दिमतीला सज्ज असतात.

डिस्ने रिसॉर्टमध्ये सगळ्यात जास्त एंजॉय करण्यासाठी आहे ती कार्टून परेड. संध्याकळी चारच्या ठोक्याला सुरू होणारी ही परेड म्हरजेतर त्या धामधुमीचा कळसच असतो. विविध फुलांफळांचे आकार असलेल्या वाहनांतून डिस्नेची कार्टून्स रस्त्यावर अवतरतात आणि डिस्नेच्या प्रसिद्ध धूनवर लयबद्ध नृत्य करायला लागतात. डिस्नेची सगळी कार्टून्स यात सहभागी होतात. यात परेडमध्ये सहभागी झालेले  पिनोचिहो, डोनाल्ड डक, गुफी, स्नोव्हाईट ही कार्टून्स आपल्या हातातल्या वॉटरगनमदून सभोवती जमलेल्या मुलांच्या अंगावर पाणी उडवतात आणि बच्चेकंपनी एकदम खूश होऊन जाते. फक्त परेडच नव्हे तर कार्टून फिल्मपासून किंग लायन शोपर्यंत अनेक गोष्टी मुलांना रिझवण्यासाठी सज्ज असतात. 
 
वेट अमेरिकेतील डिस्ने लॅण्डच्या धर्तीवर वसवलेली ही कार्टूननगरी आहे. संपूर्ण जगात अशी पाच डिस्ने पार्क आहेत. त्यापैकी आशिया खंडातलं डिस्नेपार्क हाँगकाँगला आहे. या रिसॉर्टच्या मार्केटिंग हेड वेन्डी चू सांगतात, दिवसेंदिवस भारतातून येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. 

वेबदुनिया वर वाचा