केरळ पर्यटन महामंडळातर्फे ‘गॉडस् ऑफ कंट्री’

सोमवार, 23 फेब्रुवारी 2015 (12:56 IST)
पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन केरळ पर्यटन महामंडळाच्यावतीने ‘गॉड्स ऑफ कंट्री’ हा नवा प्रकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये संस्कृतीचा वारसा, वैशिष्टय़पूर्ण अन्न पदार्थ, संगीत, कला यांचा समावेश आहे. भारत बरोबरच चीन आणि श्रीलंका या देशातही पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे. 
 
गेल्या वर्षभरात परदेशी पर्यटकांचे प्रमाण 7.60 टक्के वाढले असून देशातील पर्यटकांचे प्रमाण 7.71 टक्के वाढले आहे. परकीय चलनात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यासारख्या देशामध्ये केरळ पर्यटनाविषयी जागृती केली जाणार आहे. 
 
त्यासाठी तेथे रोड शो चे आयोजन केले जाणार आहे. तसेच दिल्ली आणि मुंबईमध्ये खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाईल. तसेच महामंडळाच्यावतीने खास सवलतीच्या दरात पर्यटन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सांगण्यात आली. 

वेबदुनिया वर वाचा