तरंगती हॉटेल्स अर्थात एम. एस. सी. म्युझिका

शुक्रवार, 17 जुलै 2015 (11:35 IST)
जग खर्‍या अर्थाने पायहाचे असेल तर समुद्रामार्गे बोटीने फिरायला हवे. कोलंबसने अमेरिकेचा आणि वास्को-द- गामाने भारताचा बोटीने प्रवास केला म्हणून त्यांना नवीन देशांचा शोध लागला. 
 
सात दिवसांच्या समुद्र प्रवासात इटलीतील व्हेनीपासून ग्रीसच्या काराकोलन, संतोरिनी, पिराथस, किरकू, कोटोर, मोन्टेग्रो आणि पुन्हा इटली आणि ग्रीसमधील नवीन शहरे आणि बंदरे पाहता येतात. विमान प्रवासात हे सर्व जवळून पाहता येत नाही. कधी हिरवा तर कधी निळा समुद्र, समुद्राचे पारदर्शक दर्शन, स्वच्छ किनारे, मधेच लागणारी नयनरम्य बेटे आणि त्यातील जनजीवन, जग नक्की कसे आहे आणि आपण कुठे आहोत याचा अनुभव देणारा प्रवास समुद्रातूनच व्हायला हवा. समुद्रात आठ दिवस राहण्याची मजा रोमांचक आहे. विमान प्रवासात पैसे घालून विमानतळावर लटकण्यापेक्षा पर्यटकासाठी ‘क्रुझेस’ म्हणजे बोटींचा पर्याय आपल्याकडील पर्यटकांनी निवडाला हवा. 
 
‘एम. एस. सी. म्युझिका’ या भव्य बोटीने जाताना आपण एका वेगळच विश्वात प्रवेश करीत आहोत असे वाटते. 393 मीटर लांब आणि 42 मीटर रूंद अशी ही बोट! 2006 साली ही बोट पूर्ण तयार होऊन समुद्रात उतरली. सोफ्रिया लॉरेनने तिचे उद्घाटन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान या बोटीच्या कामात वापरले आहे. बोटीवर 1150 कर्मचारी आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य कधीच मावळत नाही. हे सर्व लोक 17-18 तास काम करतात. पर्यटकांच्या सेवेस सदैव तत्पर असतात. 
 
टायटॅनिक चित्रपटातील थरार ज्यांनी अनुभवला त्यांना एमएससी म्युझिकाची भव्यता समजेल. चहूकडे पाणी असले तरी आगीचा सर्वाधिक धोका समुद्रातच असतो. समुद्र कधी रूद्रावतार धारण करील याचा भरवसा नसतो. त्यामुळे बोटीत शिरताच पहिल्या दर एक तासात सगळ्यांसाठी सक्तीचे ‘सुरक्षा प्रात्याक्षिक’ केले जाते. ते पुर्ण झाले की पर्यटक त्या बोटीचे कुटुंब सदस्य बनतात. ही बोट 16 मजल्यांची आहे. या बोटीत 1350 केबिन्स म्हणजे भव्य हॉटेलात असतात तशा रूम्स. बाल्कनीत बसून समुद्राचा आनंद घेता येईल. जाताना अनेक गावे आणि बेटे पाहता येतील. या कंपनीच्या 14 ‘क्रुझ’ आज जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्ग बनल्या आहेत. आपल्याला बोटींची नावे ठेवता नाही त्यांनी कल्पकता दाखविली आहे. 
 
म. अ. खाडिलकर 

वेबदुनिया वर वाचा