मला मत द्या, अन्यथा मी शाप देईन - साक्षी महाराज

शनिवार, 13 एप्रिल 2019 (10:23 IST)
मला मत द्या, अन्यथा मी शाप देईन, असं वक्तव्य भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी केलं आहे. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून उन्नावमधून निवडून आले आहेत.
 
"लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते म्हणाले, मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिले, तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजवन किर्तन करेन. मात्र, तूर्तास मी तुमच्याकडे मतं मागत आहे. निवडणुकीमध्ये मला मत द्या, अन्यथा मी तुम्हाला शाप देईन, तुमच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेईन,"असं ते म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती