अमेरिका निवडणूक: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांच्या या आहेत तीन शक्यता

बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (13:57 IST)
अखेर तो क्षण आलाय…ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पहात होतो. हे सर्व ऑलिंम्पिक मॅरेथॉनसारखं वाटतंय..जेव्हा खेळाडू शेवटचे 400 मीटर धावण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करतात..शरीर खूप थकलेलं असतं..स्नायू दुखत असतात..पण, शेवटचे काही मीटर्स वेगाने धावण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.
 
यंदाचा निवडणूक प्रचार विलक्षण, काही प्रकारे अस्वस्थ करणारा, ज्याचा आपण कधीच विचारही केला नसेल असा होता. यापुढे काय होणार, याचं उत्तर शोधत असताना सर्व गोष्टी माझ्यासमोर हळूहळू स्पष्ट आहेत.
 
या निवडणूक निकालांच्या तीन प्रमुख शक्यता आहेत. आणि यातील एक शक्यता खरी ठरली तर मला अजिबात आश्चर्य होणार नाही. (खरंतर चौथी शक्यताही आहे पण मी त्याकडे नंतर येईन)
 
या राष्ट्राध्यक्षांकडून ग्रीनलॅंड विकत घेण्याचा प्रयत्न झाला याबाबत माहिती समोर आली. डेन्सनी पूर्वाश्रमिच्या बांधकाम व्यवसायिकाला ते विकण्यास नकार दिला. त्यानंतर बदला म्हणून राष्ट्राध्यक्षांनी या राज्याला भेट रद्द केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या निवडणुकी आधी एका पॉर्नस्टारला पैसे दिले होते.
हेलसिन्कीमध्ये त्यांना ऐकताना ते म्हणाले होते, "मी, माझ्या गुप्तचर यंत्रणांवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या बाजूला उभे असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर जास्त विश्वास ठेवेन."
 
त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवण्यात आला. ते निर्दोष मुक्त झाले. कोरोनाग्रस्त असताना वॉल्टर रीड रुग्णालयात माझ्या बाजूने जाताना मी त्यांना पाहिलं आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं हे माझ्या लक्षात आलं आहे.
 
त्यामुळे आता तीन महत्त्वाच्या शक्यतांकडे वळूया…
1- बायडन सहज जिंकतील
 
पहिल्यांदा निवडणुकीचे निकाल योग्य असतील आणि जो बायडेन मंगळवारी सहज विजयी होतील.
 
निवडणुकीच्या प्रचार संग्रामात विश्लेषण करत असताना, सौदी अरेबियातील हवामान सांगणारा किती उत्सुक असेल..तशी उत्सुकता आहे. 'आजचा दिवस खूप उष्ण असेल. आणि उद्या देखील तापमान उष्णच राहणार आहे."
निवडणुकीसाठी लागलेल्या रांगा
 
या निवडणूक प्रचारात प्रचंड गोंगाट आणि गोंधळ झाला. चार वर्षापूर्वीच्या तुलनेत बोलायचं झालं तर, देशभरात झालेलं मतदान आणि महत्त्वाच्या राज्यात झालेलं मतदान यांच्यात आश्चर्यकारकरित्या सुसंगता आहे. काहीच झालेलं नाही…काहीच बदललेलं नाही. बायडेन यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी आघाडी मिळली. मात्र फ्लोरिडा, अॅरिझोना आणि नॉर्थ कॅरोलाइनामध्ये त्यांची आघाडी कमी होती. तर दुसरीकडे, उत्तरेकडील औद्योगिक शहरांमद्ये उदाहरणार्थ मिशिगन, पेन्सलवेनिया आणि विस्कॉन्सिनमध्ये सारखीच परिस्थिती होती.
 
जर तुम्ही FiveThirtyEightBlog वाचलात, ज्या ठिकाणी महत्त्वाच्या निकालांचे सरासरी परिणाम दाखवले जातात. त्याठिकाणी ही रेस 0.1 टक्के या फरकाने अत्यंत चुरशीची असल्याचं पहायला मिळतं.
 
जेव्हा आम्ही निवडणुकीबाबत चर्चा करतो, तेव्हा 3 टक्के जास्त किंवा कमी असा अंदाज मांडतो. पण, फक्त 0.1 टक्के फरक, तो ही गेल्या काही आठवड्यांपासून हे मोजता येणं शक्य नाही. अशा परिस्थितीत मंगळवारी रात्री परिणाम असेच राहिले तर मला अजिबात आश्चर्य होणार नाही.
 
2. ट्रंप यांचा धक्कादायक विजय
 
यावरून मी आता निवडणुकीच्या दुसऱ्या शक्यतेकडे येतो. हे 2016 सारखं आहे. निवडणुकीच मतदान चुकलं आणि डोनाल्ड ट्रंप विजयी झाले. त्यांच्यासाठी फ्लोरिडा आणि पेन्सलव्हेनिया या दोन राज्यात मतदान कसं होतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.
 
बायडेन या राज्यामध्ये मतदानाच्या टक्केवारीत तीन किंवा चार पॉइंट्सने आघाडीवर आहेत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. ही फ्लोरिडापेक्षा खूप चुरशीची लढत आहे. आणि 2020 मध्ये ट्रंप लॅटिन अमेरिकन मतदारांमध्ये 2016 च्या तुलनेत खूप चांगलं करत आहेत.
 
त्याचप्रमाणे पेन्सलव्हेनियाच्या पश्चिम भागात नोकरी करणाऱ्या श्वेतवर्णीय कामगारांची मतं ट्रंप यांना अखेर तारून नेतील.
 
कोव्हिड-19 च्या काळात होणाऱ्या या निवडणुकीत मी फ्लोरिडा, ओहायो, टेन्नेसी, पेन्सलव्हेनिया, नॉर्थ कॅरोलाइना, जॉर्जिया आणि व्हर्जनियाला भेट दिली. या परिसरात तुम्ही कुठेही फिरा..ट्रंप यांच्या समर्थकांना ते फक्त आवडत नाहीत..तर स्थानिक लोक ट्रंप यांची पूजा करतात.
 
ट्रंप यांचा निवडणुकीचा अंदाज 2016 सारखाच आहे. त्यांच्या लोकांना निवडणूक संग्रामात मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्यासाठी बाहेर काढलं. या मतदारांचा निवडणूक विश्लेशकांनी कधीच विचार केला नव्हता. आणि यंदाही असच होण्याची शक्यता आहे.
 
ट्रंप यांच्या विरोधकांनी त्यांना लाखोंच्या संख्येने लोकांना एकत्र केल्यामुळे बेजबाबदार ठरवलं. कोरोना संसर्गाच्या काळात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आलं नाही. मी त्या चर्चेत जात नाही. पण, यामागे एक वेगळं समीकरण नक्कीच आहे.
 
या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन नोंदणी आवश्यक करण्यात आली होती. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच मतदार यादीत नाव आहे का नाही? याबाबत माहिती गोळा करण्यात आली. तुमच नाव मतदार यादीत नसेल तर त्यांच्याकडून तुमच नाव मतदार यादीत नोंद करून घेण्यात येत होतं. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत हजारोंच्या संख्येने नोंदणी करण्यात आलेल्यांना मतदान करता आलं.
 
राष्ट्राध्यक्ष ट्रंप, जो बायडन यांच्या वयात फक्त तीन वर्षांचं अंतर आहे. पण, ट्रंप बायडन यांच्यापेक्षा खूप दमदार आणि व्हायब्रंट आहेत.
 
3. बायडन यांचा धक्कादायक आणि मोठ्या फरकाने विजय
 
या शक्यतेत बायडन नुसते विजयी होणार नाहीत. तर, मोठ्या फरकाने त्यांचा विजय होईल. 1980 मध्ये जिम कार्टर यांच्या विरोधात रोनाल्ड रेगन यांच्या विजयासारखं किंवा 1988 मध्ये मायकल डुकाकिस यांच्या विरोधात जॉर्ज बुश यांचा विजय असो.
राष्ट्राध्यक्षांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहिलं आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. मृत्यूचे आकडे हजारोंच्या संख्येने वर जाऊ लागले. स्टॉक मार्केटसाठी हा आठवडा मार्चपासून सर्वात खराब असल्याचं त्यांनी पाहिलंय. राष्ट्राध्यक्षांसाठी आर्थिक आरोग्य सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे.
 
2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकन मतदारांना स्पष्ट संदेश दिला होता. त्यांना भिंत बांधायची होती. मुस्लिमांना बाहेर ठेवायचं होतं. व्यापाराचे करार त्यांना नव्याने बनवायचे होते. उत्पादन वाढवण्यावर त्यांचा भर होता. पण, 2020 मध्ये दुसऱ्या टर्मसाठी मतदारांसमोर जात असताना पुढे नक्की काय करायचं आहे हे सांगताना ते अडखळत होते.
जर ब्लोआउट झाला. तर बायडन मी पहिल्या शक्यतेत सांगितल्याप्रमाणे फक्त ती राज्य जिंकणार नाहीत. तर, टेक्सास, ओहायो, आयोवा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलाइन जिंकण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
 
पण तुम्ही आर्थिक गणितं तपासली. निवडणुकांकडे लक्षपूर्वक पाहिलं, मतदानाच्या पॅटर्नचा अभ्यास केला. ट्रंपच्या विरोधकांनी कोणत्या राज्यात जास्त ताकद लावली. त्याचसोबत नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या लक्षात घेतली. तर, अशक्य काहीच नाही अंस नक्की म्हणता येईल.
 
अशक्य परिणाम (पण हे 2020 आहे)
आता चौथी शक्यता. नेब्रास्कामध्ये ज्या प्रकारे इलेक्टोरल मतं विभागली जातात. जेव्हा जिंकण्यासाठी 270 मतांची गरज आहे. अशा परिस्थिती बायडेन आणि ट्रंप दोघंही 269 मतांवर येऊन थांबतील.
 
आणि मग या ज्या निवडणुकीत अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यात आले. सर्वच वेगळं होईल. कायदेशीर लढाई सुरू होईल.
 
ही शक्यता फार कमी आहे. पण, हे 2020 चं वर्ष आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती