हिऱ्यांच्या निर्मितीची रंजक गोष्ट आणि मौल्यवान ब्लू डायमंडचं रहस्य

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (21:53 IST)
जगात अब्जावधी वर्षांपूर्वी हिरे तयार झाले होते. यापैकी काही हिऱ्यांची चमक पाहून आपले डोळे दिपून जातात.
शाश्वत प्रेमाचं वचन म्हणून याकडं पाहिलं जातं. तसंच समृद्धी आणि चैनीचं प्रतिक म्हणूनही याकडं पाहिलं जातं.
जुन्या काळापासून मनाला शांतता देणारी वस्तू म्हणून याची ओळख आहे. याचा वापर केल्यानं बळ मिळतं, असंही म्हटलं जातं. शत्रू, वाईट स्वप्नं आणि वाईट प्रवृत्ती यापासून हिरा रक्षण करतो, असाही दावा केला जातो.
 
भारतात वेदांमध्येही हिऱ्यांचा उल्लेख आहे. हिरा हा हिंदू देवतांचाही आवडता राहिलेला आहे.
ईसवीसन 868 च्या बौद्ध धर्माशी संबंधित 'हिरक सूत्र' नुसार हिरा ही अशी वास्तू आहे ज्याद्वारे तुम्ही जगातील भ्रम दूर सारून शाश्वत बाबींवर प्रकाश टाकू शकता.
मात्र, प्राचीन ग्रीसमध्ये कदाचित याची सर्वांत चांगली व्याख्या करण्यात आली आहे. ग्रीसवासियांनी याला ईश्वराचे आसू किंवा आकाशातून कोसळलेला ताऱ्यांचा तुकडा म्हटलंय.
हिऱ्यांबाबत सर्वांत खास बाब म्हणजे यातील खरेपणा अनन्यसाधारण आहे. याच्याशी संबंधित काही अनोख्या अख्यायिकाही आहेत.
 
हिऱ्याला 'फँटसी' का म्हटलं जातं?
हिरे ज्या तत्वापासून तयार झाले आहेत, तेच जीवनाचाही आधार आहे. ते म्हणजे कार्बन.
हिरे प्रचंड कठोर असतात. ज्या परिस्थितीत त्यांची निर्मिती होते, त्यामुळं त्यात प्रचंड दबाव सहण करण्याची क्षमताही असते. तरीही जर हायड्रोजन आणि तापमानाचा योग्य संयोग झाला तर त्याचं कार्बन डायऑक्साईड तयार होऊन तो हवेत उडूही शकतो.
हिरे हे असामान्य प्रमाणात तेजस्वी आणि चमकदार असतात. पण हे अत्यंत कठोरही असतात. ते उष्णतेचे उत्तम वाहक असतात. तापमानामुळं त्यांच्या आकारात अत्यंत मोजकं परिवर्तन होतं. क्षारयुक्त आणि आम्लयुक्त रसायनांप्रतीही ते निष्क्रिय असतं. खोल अतिनील किरणांमुळं ते पारदर्शक बनतात. इलेक्ट्रॉनबरोबर नकारात्मक संबंध असलेल्या काही मोजक्या ज्ञात वस्तुंपैकी ते एक आहेत.
पृथ्वीवर अगदी मोजक्या ठिकाणी नैसर्गिकपणे त्याची निर्मिती होते. त्याची निर्मिती पृथ्वीच्या खाली सर्वांत वरच्या दोन थरांमध्ये होतो किंवा उल्कापाताच्या परिणामामुळं ते तयार होतात.
हिरे अत्यंत स्फोटक पद्धतीनं पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. इतिहासात पृथ्वीच्या आतमध्ये आतापर्यंतचे जे सर्वात मोठे स्फोट झाले आहेत, त्याचा परिणाम म्हणजे हे हिरे आहेत. या स्फोटांमुळं निर्माण झालेल्या ज्वालामुखींची काही मुळं पृथ्वीमध्ये खोलवर रुतलेली आहेत.
सर्वच हिरे पारदर्शक नसतात. काही फिकट पिवळे आणि काही तपकिरी रंगाचे असतात.
काही हिरे रंगीतही असतात आणि त्याला फँटसी म्हटलं जातं. लाल, निळे आणि हिरव्या रंगाचे हिरे जवळपास दुर्मिळ आहेत. नारंगी, पिवळे आणि काहीसे पिवळसर हिरवे हिरे सर्वांत सामान्य आहेत.
पण एकदा हिरे तयार झाले की, त्यांच्यात क्रिस्टल सारख्या साच्यामध्ये कोणताही धातू धारण करण्याची त्याला सुरक्षितपणे ठेवण्याची क्षमता असते. शास्त्रज्ञांसाठी ते पृथ्वीच्या सर्वांत जाड पृष्ठभागामध्ये आढळणाऱ्या खनिजाची झलक देतात. सोबतंच पृथ्वीच्या शेकडो मैल खोल नेमकी स्थिती काय आहे, हेही ते सांगतात. या अर्थानं ब्लू डायमंड किंवा निळा हिरा अत्यंत खास आहे.
 
शुद्धतेत सर्वांत सरस
आपल्या विश्वातील बहुतांश हिरे हे पृथ्वीच्या खाली 150 किलोमीटर खोलवर तयार होतात. निळे हिरे पृथ्वीच्या सर्वांत खाली असलेल्या आवरणात चार पट खोलीपर्यंत तयार होतात.
2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आलीय.
जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकाचे भूगर्भतज्ज्ञ इव्हान स्मिथ यांच्या मते, हिऱ्यासारखे रत्न अत्यंत महागडे असतात. त्यामुळं वैज्ञानिक शोधाच्या उद्देशानं ते मिळवणं कठिण असतं. स्मिथ हे या प्रबंधाचे मुख्य लेखक आहेत.
हिरे हे केवळ मौल्यवान नसतात तर शुद्धतेच्या बाबतीत ते सर्वोत्तम असतात. यात दुसरं काहीही मिसळलेलं असल्याची शक्यता नसते. हिरा वगळता इतर कोणताही धातू अथवा त्याच्या निर्मितीच्या वेळी तयार होणारं यासारखं दुसरं खनिजही यात मिसळलं जाऊ शकत नाही.
 
हिऱ्याची ही अपूर्णताच याबाबत शास्त्रज्ञांना अधिक माहिती देण्यासाठी फायदेशीर ठरते.
वैज्ञानिकांनी 46 अशा ब्लू डायमंडचं विश्लेषण करण्यात यश मिळवलं आहे, ज्यात काही गोष्टी जोडण्यात आल्या होत्या. त्यांच्या मते, हे पृथ्वीच्या खाली 410 ते 660 किलोमीटर खोलीमध्ये तयार झालेले असावे.
यापैकी काही हिऱ्यांच्या नमुन्यावरून ते 660 किलोमीटर पेक्षा अधिक खोलीवर तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजे हे पृथ्वीच्या सर्वांत खालच्या आवरणात तयार झाले आहेत.
या दृष्टीनं विचार केला तर हे हिरे वास्तविक टाईम कॅप्सूल ठरले आहेत. म्हणजे याद्वारे अशी माहिती मिळते जी मिळवणं जवळपास अशक्य ठरतं.
"आपण पृथ्वीच्या अगदी आत खोलवर जाऊ शकत नाही. पण हिऱ्यांची निर्मिती तिथंच होते. साधारणपणे तिथं जे काही आहे, त्याला हे झाकून टाकतं," असं अमेरिकन म्युझियम ऑफ हिस्ट्रीचे जेम अँड मिनरल चे क्यूरेटर आणि ज्योलॉजिस्ट जॉर्ज हर्लो यांनी बीबीसी रील नॅचरलशी बोलताना सांगितलं.
त्यांच्या मते, ही एक प्रकारची अंतराळ शोध मोहीम असते. अखेर काही हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मिळतात आणि त्याच्या अभ्यासाची संधी मिळते.
 
ब्लू डायमंड : गूढ आवरण असलेलं कोडं
ब्लू डायमंड हे दीर्घकाळापासून इतिहासातील गूढ ठरले आहेत. याचा एवढा उत्तम रंग का असतो, हे अद्याप समजलेलं नाही.
अखेर अशी माहिती मिळाली की, यात बोरॉनचे अवशेष असतात. ते मेटलायड केमिकल असतं. त्यात हिऱ्याच्या वाढीदरम्यान याच्या क्रिस्टलच्या जाळ्यांमध्ये प्रवेश करण्याची क्षमता असते.
 
पण हे गूढ उकलल्यानंतर एक कोडं समोर आलं.
जर हिऱ्यांची निर्मिती पृथ्वीच्या खालच्या आवरणात झाली जिथं यांच्या थरांवर बोरॉन होतं, तर अखेर त्यांना बोरॉन कुठून मिळालं.
या भू-रासायनिक कोड्याचं उत्तर आपल्याला पृथ्वीच्या खोलीचा अंदाजही देतं.
ही कल्पना स्मिथ यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या रिसर्च ग्रुपनं सादर केली होती. त्यांच्या मते, बोरॉन समुद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या खोल आवरणाकडे गेलं. टेक्टोनिक प्लेट एकमेकांमध्ये शिरत असताना, ही घटना घडली. या प्रक्रियेला सबडक्शन म्हणतात.
पाण्यानं भरलेली खनिजं शोषूण घेत हिरा खोल समुद्र तळापर्यंत विस्तार करत असतो. अगदी समुद्राच्या प्लेट पर्यंतही पोहोचत असतो.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर एवढ्या खोल मिळणाऱ्या हिऱ्यातील बोरॉनच्या अवशेषांचा विचार करता, पाण्यानी भरलेली खनिजं पूर्वीच्या अंदाजाच्या तुलनेत अधिक खोलपर्यंत पृथ्वीच्या खोल थरांकडे प्रवास करतात, हे स्पष्ट होतं. त्यामुळं अत्यंत खोलवर एका वेगळ्या जलचक्राची शक्यता त्यामुळं निर्माण होते.
हर्लो यांच्या मते ब्लू डायमंड किंवा निळ्या रंगाचे हिरे सुंदर आणि दुर्मिळ तर असतातच, पण त्याचबरोबर हे अत्यंत रंजकही असतात. आपल्या पृथ्वीबाबत हे आपल्याला खूप काही शिकवतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती