''महाराष्ट्रात जिथं मतदान सुरू आहे. त्यातील अनेक ठिकाणी मतदानयंत्रं नीट काम करत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन जिथे जिथे मतदान यंत्रात बिघाड झालाय, तिथे मतदानाची वेळ वाढवावी'' अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार झालेला नाही. अशी कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही. एका चिन्हावर बटण दाबल्यावर कमळाला मतदान जात होतं ही सर्वथा चुकीची बाब आहे. ही दिशाभूल करणारी बाब आहे. मी निवडणूक अधिकारी म्हणून स्वतः खात्री केली आहे पण त्यात असा प्रकार आढळून आला नाही, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.