संजय राऊतांनी घेतली दिल्ली सीमेवरच्या शेतकरी आंदोलकांची भेट

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (18:39 IST)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीच्या गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेच दिली.
 
यावेळी त्याच्याबरोबर शिवसेनेचे इतर खासदारसुद्धा उपस्थित होते. राऊत यांनी यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
 
'महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहीले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख मा.ऊध्दव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.
 
त्यानंतर ते शेतकरी आंदोलकांच्या भेटीसाठी दुपारी 1 वाजता दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेले होते.
काही दिवसांपूर्वी नाशिकहून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला होता. त्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी संबोधित केलं होतं. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांवर त्यांनी जोरदार टीका केली होती.
 
आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रीय पातळीवर शेतकरी आंदोलनाविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.
 
पण मुंबईत आझाद मैदानात झालेल्या शेतकऱ्यांच्या रॅलीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी जाणं टाळलं होतं.
 
संजय राऊत यांचा दिखावा?
 
"संजय राऊतांचं दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणं म्हणजे निव्वळ दिखावा आहे. लाईमलाइ'मध्ये रहाण्यासाठी राऊत शेतकऱ्यांना भेट देत आहेत," असं ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांना वाटतं.
 
"हा राजकीय स्टंटबाजीचा प्रकार आहे. यांना शेतकऱ्यांशी काहीच देणंघेणं नाही. नेते शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेल्याने शेतकरी आंदोलनाची धार कमी होईल," असं वानखेडे यांना वाटतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती