जेटकडे अडकले प्रवाशांचे 3200 कोटी

बुधवार, 19 जून 2019 (13:16 IST)
जेट एअरवेज कंपनीचा प्रवास दिवाळखोरीच्या दिशेनं होत असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. कंपनीकडे प्रवाशांचे 3200 कोटी रुपये अडकले असून त्यांना परतावा मिळणे कठीण झाले आहे.
 
जेटचे आर्थिक व्यवस्थापन पाहणाऱ्या स्टेट बँकेने कंपनी विक्रीचा प्रयत्न करून पाहिला. तसे झाले असते तर तिकिटांचा परतावा मिळाला असता. नव्या कंपनीनेही परतावा नाकारला असता तर पैशांसाठी ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्गही उपलब्ध होता. मात्र कंपनी दिवाळखोरीत गेल्यावर हा मार्ग त्यांच्यासाठी बंद होईल.
 
आता फौजदारी प्रक्रियेचा वापर करून प्रवाशांना आपले पैसे मिळवावे लागणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासूनच कंपनीने आपली उड्डाणे कमी करायला सुरुवात केली आणि 17 एप्रिलपासून सर्वच उड्डाणे रद्द करण्यात आली.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती