शिवसेनेचा वचननामा: मुलींना मोफत शिक्षण, एका रुपयात औषधोपचार, तर 10 रुपयांत जेवण - विधानसभा निवडणूक
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (12:26 IST)
मुलींना कालेजचं विनामूल्य शिक्षण, नागरिकांना एका रुपयात औषधोपचार आणि 10 रुपयांत सकस जेवणाची थाळी तर शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 10 हजार रुपये देण्याचं वचन यंदाच्या वचननाम्यातून शिवसेनेनं दिलं आहे.
विधानसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना पक्षाचा 'वचननामा' पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (शनिवार, 12 ऑक्टोबर) सकाळी मातोश्री निवासस्थानी प्रसिद्ध केला. यावेळी खासदार अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, सचिव सुरज चव्हाण आणि उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या 16 पानी वचननाम्याला हीच ती वेळ असं नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये शेतकरी, महिला आणि तरूणांना प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवलं आहे. विविध योजनांच्या माध्यमांतून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
1. प्रथम 'ती'
आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
प्रत्येक जिल्ह्यात एक महिला बचत गट भवन, उत्पादनांच्या विक्रीकरिता जागा
शेतमजूर व असंघटीत महिला/कामगारांसाठी समान काम - समान वेतन
शासकीय शाळा महाविद्यालयात मोफत सॅनिटरी नॅपकीन
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
महानगरांमध्ये वर्किंग वूमन हॉस्टेल
2. युवा सक्षमीकरण
15 लाख पदवीधर युवकांना युवा सरकार फेलोमार्फत शिष्यवृत्ती