जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय अत्यंत योग्य पाऊल असल्याचं मत ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी व्यक्त केलंय.
यासोबतच, मोदी-शाह म्हणजे 'कृष्ण-अर्जुन' आहेत, अशा शब्दात त्यांनी कौतुकही केलं.
व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात रजनीकांत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमित शाह हे सुद्धा उपस्थित होते.
अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'साठी अभिनंदन, सलाम तुम्हाला, असंही रजनीकांत यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी अमित शाह म्हणाले, "खरंतर कलम 370 याआधीच काढून टाकायला हवं होतं. ते कलम आता रद्द केल्याबद्दल गृहमंत्री म्हणून माझ्या मनात कुठलाही गोंधळ नाहीय. या निर्णयामुळे काश्मीरमधील दहशतवाद संपून विकासाला सुरूवात होईल, असा मला विश्वास आहे"