CAA च्या समर्थनार्थ मोदींची मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरू केली आहे.  
 
या अभियानाचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सोमवारी (30 डिसेंबर) अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हीडीओ पोस्ट केला.
 
मोदींनी ट्वीट केलं की, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याशी निगडीत बाबींची स्पष्ट व्याख्या आणि इतर काही गोष्टी सद्गुरूंकडून ऐका. त्यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भांचा हवाला दिला आहे. तसंच आपली बंधुत्वाची संस्कृती उत्तम प्रकारे समजावून सांगितली आहे. याचसोबत स्वार्थासाठी पसरवण्यात आलेल्या काही समूहांच्या गोष्टींचं सत्य सर्वांसमोर मांडलं आहे."
पंतप्रधानांच्या खासगी वेबसाईटच्या ट्विटर हॅन्डलवरही एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, "नागरिकत्व दुरूस्ती कायदा हा अन्याय झाल्यामुळे भारतात शरण आलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. तसेच यामुळे कोणत्याच व्यक्तीचं नागरिकत्व धोक्यात येणार नाही."
 
हा मेसेज 'इंडिया सपोर्ट्स सीएए' या नावाच्या हॅशटॅगने पोस्ट करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती