धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला अटक

सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (15:46 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहणारा आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
 
कोलकाता नाईट रायडर्सविरोधात पराभव झाल्यानंतर धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावर CSK च्या खेळाडूंची चेष्टा करण्यात आली.
 
इतकंच नाही तर एकानं सोशल मीडियावर थेट धोनीच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. आरोपीनं धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बलात्काराची धमकी देणारे मेसेज केले होते.
 
यानंतर रांचीमधील रातू रोड येथील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती