भारत -चीन सीमा तणाव : राहुल गांधी नंतर संजय राऊत यांचे नरेंद्र मोदी यांना सवाल

बुधवार, 17 जून 2020 (13:22 IST)
भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला 5 प्रश्न विचारले आहेत.
 
"पंतप्रधान गप्प का आहेत?
 
ते समोर का येत नाहीत?
 
झालं ते खूप झालं. भारत-चीन सीमेवर नेमकं काय घडलं हे आम्हाला कळायलाच हवं.
 
आपल्या सैनिकांवर हल्ला करण्याचं धाडस चीन कसं करतं?
 
ते आपली जमीन कशी बळकावू शकतात?"
 
अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 
गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीतला आधी भारताचे तीन जवान मृत्युमुखी झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
 
पण या चकमकीत किमान 20 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. ही गेल्या 45 वर्षांतील सर्वांत मोठी चकमक असल्याचं म्हटलं जात आहे.
 
लष्कराने सांगितलं आहे की या चकमकीत 17 सैनिक गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं लष्कराने सांगितलं होतं.
 
चीनचे किती जवान मारण्यात आले? चीनने
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. देश तुमच्याबरोबर आहे पण सत्य सांगा असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
 
राऊत म्हणातात,
 
"पंतप्रधानजी तुम्ही शूर योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.
 
चीनच्या घुसखोरीला केव्हा प्रत्युत्तर देणार? गोळीबार न होता भारताचे 20 जवान शहीद होतात. आपण काय केलं?
 आपली जमीन बळकावली आहे का? पंतप्रधानजी, या अवघड काळात देश तुमच्याबरोबर आहे. पण सत्य काय आहे?
 
बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती